महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार १५ एप्रिलपर्यंत पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. पबमधली गर्दीमुळे कोरोना वाढत असल्याचे लक्षात घेत आता रात्री ८ नंतर पाच जणांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पब, मॉल आणि समुद्रकिनारे अशा सर्व ठिकाणी आता रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत एकत्र येता येणार नाही.या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लावायचा की नाही, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक तारखेनंतर निर्णय घेतील, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics